adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी कट्टा हातात घेऊन थांबलेल्या युवकाला LCB ची शिताफीने पकड..पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

 गावठी कट्टा हातात घेऊन थांबलेल्या युवकाला LCB ची शिताफीने पकड..पिस्टल व जिवंत काडतूस जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 गावठी कट्टा हातात घेऊन थांबलेल्या युवकाला LCB ची शिताफीने पकड..पिस्टल व जिवंत काडतूस जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

-अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडत ३० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व १ हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. महादेव गुट्टे यांच्या पथकास अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर धडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते.दि.08 डिसेंबर 2025 रोजी पथक एमआयडीसी परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नगर–मनमाड रोडलगत साई पान शॉपच्या अंधारात एक इसम गावठी कट्टा घेऊन थांबलेला असल्याची खबर मिळाली.त्यावर पथकाने त्वरित धाव घेत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.तपासा दरम्यान त्याने आपले नाव दिपक साळवे (रा. शिंगवे नाईक,ता.जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्या ताब्यातून ३०,००० रुपये किंमतीचा एक गावठी पिस्तूल १,००० रुपये किंमतीचे ०१ जिवंत काडतूस असा ३१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी पोहेकॉ/1502 दिपक भास्कर घाटकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 912/2025, आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ महादेव गुट्टे,पोलीस अमंलदार ह्रदय घोडके,दिपक घाटकर, बिरप्पा करमल,भिमराज खर्से, राहुल डोके,योगेश कर्डिले,सतिष भवर,चालक उमाकांत गावडे, अरुण मोरे यांनी केली आहे.

No comments