adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..

 यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) क...

 यावल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.. 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय करून दिला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पिढ्यानपिढ्यांसाठी दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहील. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे, डॉ.आर. डी पवार, प्रा. मनोज पाटील, प्रा. भागवत पाटील, प्रा. राजेंद्र थिगळे, श्री मिलिंद बोरघडे प्रा. संतोष जाधव, प्रा. सी. टी. वसावे, प्रा. नागेश्वर जगताप, प्रा. अर्जुन गाढे, श्री. अनिल पाटील, श्री. प्रमोद कदम, श्री प्रमोद भोईटे आणि श्री. संतोष ठाकूर  उपस्थित होते.

No comments