adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर बार असोसिएशनमध्ये बदलाचा एल्गार..ॲड.राणी भुतकर मैदानात..एक मत…एक विश्वास…वकील बांधवांना विजयासाठी हृदयस्पर्शी साद..!

अहिल्यानगर बार असोसिएशनमध्ये बदलाचा एल्गार..ॲड.राणी भुतकर मैदानात..एक मत…एक विश्वास…वकील बांधवांना विजयासाठी हृदयस्पर्शी साद..! सचिन मोकळं अ...

अहिल्यानगर बार असोसिएशनमध्ये बदलाचा एल्गार..ॲड.राणी भुतकर मैदानात..एक मत…एक विश्वास…वकील बांधवांना विजयासाठी हृदयस्पर्शी साद..!


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२१):-अहिल्यानगर बार असोसिएशनच्या सन २०२५-२६ या कालावधीसाठी होऊ घातलेल्या पदाधिकारी निवडणुकीत ॲड.राणी गोरख भुतकर (बुगे) यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बार असोसिएशनमधील सर्व सहकारी वकील बांधवांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना ॲड.राणी भुतकर यांनी सांगितले की,अहिल्यानगर बार असोसिएशन ही केवळ एक संघटना नसून,ती न्यायव्यवस्थेचा कणा असून वकील बांधवांचे हक्क,सन्मान आणि सुविधा यांचे संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी तिच्यावर आहे.या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवूनच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतदान हे २३ डिसेंबर २०२५ रोजी असून भुतकर यांचा अनुक्रमांक ३ असून त्यांना 
कायदा क्षेत्रातील अनुभव,बार असोसिएशनमधील सक्रिय सहभाग आणि वकील बांधवांच्या अडचणींची जाण यांच्या जोरावर संघटनेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.तरुण वकील,महिला वकील तसेच ज्येष्ठ वकील यांना समान न्याय,पारदर्शक कारभार आणि संघटनेत सुसंवाद निर्माण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बार असोसिएशनच्या माध्यमातून वकील बांधवांसाठी अधिक सुविधा,न्यायालयीन कामकाजाशी संबंधित प्रश्नांचे प्रभावी निराकरण तसेच संघटनेचा सन्मान व प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास ॲड.राणी भुतकर यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत वकील बांधवांनी एकजुटीने साथ देत प्रचंड बहुमताने विजयी करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अहिल्यानगर बार असोसिएशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड.राणी भुतकर यांच्या उमेदवारीमुळे वकील वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments