अहिल्यानगर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीचे रणसंग्राम संपले! भाजपचाच दबदबा..आघाड्या-सेनेची सरशी; जिल्ह्याच्या राजकारणाला नवा चेहरा सचिन मोक...
अहिल्यानगर जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीचे रणसंग्राम संपले!
भाजपचाच दबदबा..आघाड्या-सेनेची सरशी; जिल्ह्याच्या राजकारणाला नवा चेहरा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे. भाजपने बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवत आपला दबदबा कायम राखला असून, काँग्रेस, शिंदे गट शिवसेना व स्थानिक विकास आघाड्यांनाही काही ठिकाणी यश मिळाले आहे.
नगराध्यक्ष पदांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
राहाता : नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी.
संगमनेर : शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे विजयी.
देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम विजयी.
पाथर्डी : नगराध्यक्षपदी भाजपचे अभय आव्हाड विजयी.
श्रीरामपूर : नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी.
शिर्डी : नगराध्यक्षपदी भाजपच्या जयश्री थोरात विजयी.
श्रीगोंदा : नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनिता खेतमाळीस विजयी.
जामखेड : नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या प्रांजल अमित चिंतामणी विजयी.
शेवगाव : नगराध्यक्षपदी शिंदे गट शिवसेनेच्या माया मुंडे विजयी.
राहुरी : नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी.
कोपरगाव : नगराध्यक्षपदी भाजपचे पराग संधान विजयी.
नेवासा : नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे करणसिंह घुले विजयी.
या निकालांनंतर संबंधित नगरपालिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर शहर विकास, नागरी सुविधा आणि पारदर्शक कारभाराची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील राजकारणासाठी हे निकाल आगामी काळात महत्त्वाचे ठरणार असल्याचे चित्र आहे.

No comments