adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी थंडीपासून बचावाकरीता स्वेटर, टोपी, मफलर सारख्या वस्तूंचे केले वितरण

  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी थंडीपासून बचावाकरीता स्वेटर, टोपी, मफलर सारख्या वस्तूंचे केले वितरण   अमोल बावस्कार बु...

 प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी थंडीपासून बचावाकरीता स्वेटर, टोपी, मफलर सारख्या वस्तूंचे केले वितरण  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- उघड्यावर राहणार्‍या गोरगरीब, बेसहारा थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची निकड लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी शहरातील अशा व्यक्तींना स्वेटर, टोपी, मफलर देवून एक माणुसकीचा धर्म जोपासण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


मलकापूर शहरात मागील काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला असून उघड्यावर राहणार्‍या गोरगरीब, बेघर आणि निराधार लोकांचे हाल अधिकच वाढले आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना उबदार कपड्यांची निकड ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध भागात जाऊन गरजूंपर्यंत स्वेटर, टोपी आणि मफलर वाटप केले. थंडीच्या लाटेत थरथरणार्‍या व्यक्तींना उबदार कपडे मिळताच त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि दिलास्याचे भाव उमटले. अनेकांनी अजय टप यांच्या या सामाजिक बांधिलकीचे स्वागत करत ‘असल्या मानवतेच्या कामामुळेच समाजात उबदारपणा टिकून राहतो,’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

आज सायंकाळी शहरातील मोकळी पटांगणे, रेल्वे स्थानक परिसर, कॉटन मार्वेâट परिसर, बसस्थानक परिसर तसेच रस्त्यालगत उघड्यावर राहणारे व पाल ठोकून राहणार्‍या कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन थंडीपासून बचावाकरीता स्वेटर, टोपी, मफलर सारख्या वस्तूंचे वितरण केले. त्यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते. थंडीच्या दिवसांत ‘कोणीही उघड्यावर थरथरू नये’ यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत ‘जिथे माणुसकी असते, तिथे देवपणही उतरतं’ या म्हणीने त्यांच्या कार्याचा गौरव केला. अजय टप यांचा हा उपक्रम केवळ उबदार कपडे देण्यापुरता मर्यादित न राहता समाजात माणुसकीची नवी चळवळ निर्माण करणारा ठरला असून मलकापूरकरांच्या मनात त्यांनी उबदार जागा निर्माण केली आहे.

No comments