नायगाव येथे सातपुडा माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न नायगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या...
नायगाव येथे सातपुडा माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज संचलित सातपुडा माध्यमिक विद्यालय, नायगाव येथे आनंद मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शालेय विद्यार्थिनींच्या परंपरागत लेझीम पथकाद्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय चेअरमन मा. श्री. संभाजी अमृत पाटील हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव ग्रामपंचायत सरपंच मा. नूरजान सर्फराज तडवी, शाळेचे व्हा. चेअरमन व माजी सरपंच मा. लीलाधर विश्वनाथ पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष मा. कल्पेश राजेंद्र पवार तसेच निसार दगडू तडवी, सर्फराज तडवी यांच्यासह नायगाव गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. वाय. एम. नायडे सर यांनी आनंद मेळाव्याचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. ज्येष्ठ शिक्षक मा. आबासो व्ही. बी. सूर्यवंशी सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर मा. पी. व्ही. बोबडे सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. ए. डी. पाकडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मा. एस. ए. तडवी सर यांनी केले. या आनंद मेळाव्यास भूषण पवार (भाऊसाहेब), वंजारी सर, पावरा सर, अप्सरा तडवी मॅडम, वंदना पवार मॅडम, मनोज मोरे सर, संजीव पाटील (शिपाई) तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही, आनंददायी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



No comments