adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल–भुसावळ रोडवर शेतातील मका जाळला; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

 यावल–भुसावळ रोडवर शेतातील मका जाळला; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान   भरत कोळी ता.यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज गुरुवार, दि. २५ डिस...

 यावल–भुसावळ रोडवर शेतातील मका जाळला; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान  


भरत कोळी ता.यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी यावल–भुसावळ रोडवर यावल शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापणीवर असलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर आग लागून शेतकऱ्याचे अंदाजे २ ते २.५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

संबंधित शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास शेतात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर मका जळून खाक झाला होता. या घटनेची माहिती मिळताच यावल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविका सौ. नंदा महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

No comments