विराज कॉलनीत १४ लाखांची घरफोडी उघडकीस..!ठाण्यातून सराईत चोरटा जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक...
विराज कॉलनीत १४ लाखांची घरफोडी उघडकीस..!ठाण्यातून सराईत चोरटा जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-विराज कॉलनी सावेडी येथील एका बंद घरात तब्बल 14 लाख 75 हजार रुपयांची घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी ठाणे येथे जाऊन अटक केली आहे. रफिक मेहबुब शेख (वय 43,रा. राबोडी,ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.फिर्यादी अशोककुमार विजयकुमार अग्रवाल (वय 50, रा. बंगला क्र.06,विराज कॉलनी, सावेडी) हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असताना,दि.13 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2025 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला.लॉकर व कपाटातील सोने-चांदीचे दागिने,घड्याळे व रोख रक्कम असा एकूण 14,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331(4), 305(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि.राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश माळी,शाहिद शेख,गणेश धोत्रे,फुरकान शेख,प्रकाश मांडगे, रोहित येमुल,अमृत आढाव व महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.तपासा दरम्यान व्यावसायिक कौशल्याच्या आधारे हा गुन्हा रफिक मेहबुब शेख व त्याच्या इतर दोन फरार साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने ठाण्यात जाऊन शोध घेतला असता,राबोडी परिसरातून रफिक शेख याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.अटक करण्यात आलेला आरोपी रफिक शेख याच्याविरुद्ध यापूर्वी सातारा, ठाणे व सांगली जिल्ह्यांत घरफोडी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपीस पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

No comments