दारू माफियांचे अड्डे उद्ध्वस्त..डीवायएसपी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल नष्ट कर...
दारू माफियांचे अड्डे उद्ध्वस्त..डीवायएसपी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात यश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२५):- ग्रामीण पोलीस दलाने अवैध दारू व्यवसायाविरुद्ध निर्णायक आणि धडाकेबाज कारवाई करत दारू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत निघोज–पठारवाडी शिवारातील कुकडी कॅनॉल लगत सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या निघोज,पठारवाडी शिवारात छापा टाकून पोलीस पथकाने १४,००० रुपये किमतीची १४० लिटर तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ३७,७०० लिटर कच्चे रसायन व साहित्य जप्त करून घटनास्थळीच नष्ट केले.या कारवाईत एकूण १८,६६,५०० रुपये किमतीच्या मुद्देमालाचा नायनाट करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोकॉ.प्रकाश बोबडे, पारनेर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे आदिनाथ मच्छींद्र पठारे,रा. पठारवाडी,निघोज (ता.पारनेर, जि.अहिल्यानगर) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे हे करीत आहेत.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत श्री.शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर ग्रामीण विभाग) यांच्या नेतृत्वाखाली पोनि.संतोष खेडकर, सहा.फौजदार कडुस, सहा.फौजदार गणेश डहाळे,पोहेकॉ.गणेश धुमाळ,पोकॉ.रणजीत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य साठे, पोलीस कॉन्स्टेबल बोबडे,पोकॉ. योगेश सातपुते व पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे यांचा समावेश असलेल्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी पद्धतीने ही कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईमुळे पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, भविष्यातही अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


No comments