साळवे ग्रामपंचायतीत तहसील कार्यालय धरणगाव तर्फे लोकशाही दिन उत्साहात साजरा विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : तालुक्...
साळवे ग्रामपंचायतीत तहसील कार्यालय धरणगाव तर्फे लोकशाही दिन उत्साहात साजरा
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील साळवे येथे तहसील कार्यालय, धरणगाव यांच्या वतीने लोकशाही दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. संदीप मोरे हे उपस्थित होते. लोकशाही दिनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी महसूल, पुरवठा, भूमी अभिलेख, कृषी, वीज, शिक्षण तसेच इतर प्रशासकीय बाबींशी संबंधित तक्रारी व समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या व त्यावर त्वरित मार्गदर्शन करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी पुरवठा अवल कारकून श्री. किशोर मोरे, भूमी अभिलेख विभागाचे श्री. पंधारे, कृषी सहाय्यक दीपाली कांबळे उपस्थित होते. तसेच साळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आशा कोल्हे, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिगंबर नारखेडे, साळवे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. मोरे, व शिक्षक,अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी भगिनी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधला गेला. नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ दखल घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विकासासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मत ग्राम यावेळी व्यक्त केले.

No comments