"खेळ खेळूया – संविधान समजूया" उपक्रम पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) "खेळ खेळूया – संविधान समजूया" या...
"खेळ खेळूया – संविधान समजूया" उपक्रम
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
"खेळ खेळूया – संविधान समजूया" या घोषणेनुसार संविधान जागर अभियानांतर्गत नव संकल्प फाउंडेशनच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर रोजी महात्मा फुले महाविद्यालय मांडका यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर खूटपुरी येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सापशिडी,व संविधान जागरुकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या सत्राचे मार्गदर्शन व संयोजन नव संकल्प फाउंडेशनचे बंटी गव्हांदे आणि वैष्णवी गोलाईत यांनी केले. संवादात्मक पद्धतीने, खेळांच्या माध्यमातून आणि उदाहरणांसह संविधान समजावून सांगण्यात आले.या वेळी नव संकल्प फाउंडेशनचे अनुष्का वखरे, पायल गवळी, संतोष साळुंखे, रुद्राक्ष सोळंके तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सेवक आणि स्वयंसेविका परिसरातील महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित होते.

No comments