adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिवसाढवळ्या गोळीबाराने एकच खळबळ..!थरकाप उडवणारा हल्ला..३ आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या

  दिवसाढवळ्या गोळीबाराने एकच खळबळ..!थरकाप उडवणारा हल्ला..३ आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 दिवसाढवळ्या गोळीबाराने एकच खळबळ..!थरकाप उडवणारा हल्ला..३ आरोपींना LCB ने ठोकल्या बेड्या  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२१):-जामखेड शहरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून,या गंभीर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या २४ तासांत तिघा आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून गावठी कट्टा तसेच चोरलेला सी.सी.टी.व्ही. डी.व्ही.आर.असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी रोहित अनिल पवार (रा. कान्होपात्रानगर,जामखेड) हे जामखेड–बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे असताना आरोपींनी हॉटेलसमोर येऊन त्यांच्याकडील गावठी कट्टा काढून फिर्यादीच्या दिशेने जीवघेणा फायर केला.या गोळीबारात फिर्यादी जखमी झाला.

या घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 669/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191(2), 190, 324(5), 351(2)(3) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोउपनि अनंत सालगुडे यांच्यासह अतुल लोटके,शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ,मनोज साखरे,सागर ससाणे,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड,महादेव भांड व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करण्यात आले.पथकाने शोध मोहीम राबवत दि.१८ डिसेंबर रोजी जामखेड रोड, आष्टी परिसरात कारवाई करून उल्हास उर्फ वस्ताद विलास माने (वय ४९, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) यास हॉटेल साईराज समोरून ताब्यात घेतले.चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

यानंतर दि.१९ डिसेंबर रोजी वाळुंज शिवारातील अहिल्यानगर–सोलापूर रोडवरील हॉटेल शाम परिसरात सापळा रचून शुभम शहाराम लोखंडे (वय २६, रा. आष्टी, जि. बीड) व बालाजी शिवाजी साप्ते (वय २७, रा. आष्टी, जि. बीड) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच फिर्यादीकडून काढून नेलेला २० हजार रुपये किमतीचा सी.सी.टी.व्ही. डी.व्ही.आर.असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तिन्ही आरोपींना पुढील तपासकामी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगरच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून, या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे.

No comments