आदित्य स्कूलमध्ये रीलस्टर ब्लॉगर चि.तुषार (ऋषी)रामचंद्र कोळींच्या हस्ते बक्षीस वितरण रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर:-...
आदित्य स्कूलमध्ये रीलस्टर ब्लॉगर चि.तुषार (ऋषी)रामचंद्र कोळींच्या हस्ते बक्षीस वितरण
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर:- शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेरमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन, मुंबई द्वारा राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध कला स्पर्धेत इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन ,
विविध स्पर्धेत गुणप्रदर्शन केले.
या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चित्रकला, हस्तकला,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व विविध कलाप्रकारांचे सुंदर प्रदर्शन केले.
या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले.
1. नव्या मयूर महाजन इ.3 (ब)
2. आरोही मयूर चौधरी इ.5(ब)
3. अंश किरण पाटील इ. 2(ब)
4. पार्थ मयूर चौधरी इ.1 (ब)
5. सिद्धी चंद्रकांत पाटील इ.7(अ)
6. माही राजेश तायडे इ.4 (अ)
7. शौर्य विशाल भिसे इ.9 (अ)
8. श्रेयस योगेश महाजन इ.5 (अ)
9. ज्ञानसी नितीन भवर इ.1 (ब)
10. लावण्या राहुल चौधरी इ.1 (ब)
11. लक्ष वैभव नेहेते इ.4 (ब) संस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत झटकार सर व मुख्याध्यापिका सौ. सविता झटकार मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यावेळी उपस्थित श्री. वैभव नेहते , डॉ. अशोक अजलसोंडे, डॉ. क्षितीज चौधरी, श्री. प्रशांत सोनार, श्री. नितीन भवर, चि तुषार (ऋषी) रामचंद्र कोळी हे उपस्थित होते.

No comments