नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या खामगांव तालुका अध्यक्षपदी पद्माकर धुरंधर पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव :पत्रकार पद्...
नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या खामगांव तालुका अध्यक्षपदी पद्माकर धुरंधर
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव :पत्रकार पद्माकर धुरंधर यांची नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम या राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी पत्रकार संघटनेच्या खामगांव तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.पत्रकार मुकेश हेलोडे,खामगांव तालुका उपाध्यक्षपदी तर श्याम सरकटे यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या महत्वपूर्ण बैठकीत करण्यात आली. बैठकीदरम्यान संघटनेच्या भविष्यातील वाटचाल, पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न, मान-सन्मान, आर्थिक व व्यावसायिक अडवणी तसेच संघटन बळकटीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते पद्माकर धुरंधर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. पत्रकार पद्माकर धुरंधर हे पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी घेतलेल्या ठाम भूमिकेसाठी ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली खामगांव तालुक्यातील पत्रकार संघटना अधिक संघटित,सक्षम आति प्रभावी बनेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या बैठकीला नेशनल व्हॉइस मीडिया फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प्रभारी) देवचंद्र समदुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच बुलडाणा जिल्हा महासचिव रामेश्वर खरात यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली.यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शितल शेगोकार यांच्यासह संघटनेचे सक्रिय पदाधिकारी शेख अमिन,प्रफुल्ल साबळे,प्रदीप सरदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रफुल्ल साबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,नॅशनल हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना ठाम भूमिका घेईल,तसेच नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन,प्रशिक्षण आणि संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत लेख पद्माकर धुरंधर यांच्या नेतृत्वाखाली खामगांव तालुक्यातील पत्रकार संघटना नवी दिशा घेईल,असा ठाम विश्वास व्यक्त केला.सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकार बांधवांनी नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष,सचिव यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या बैठकीला संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाच्या (प्रभारी) देवचंद्र समदुर जिल्हा महासचिव रामेश्वर खरात बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष शितल शेगोकार संघटनेचे पदाधिकारी अमीन शेख,प्रफुल्ल साबळे,प्रदीप सरदार आदी उपस्थित होते.

No comments