धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात सिकलसेल जनजागृती कार्यक्रम संपन्न धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात सिकलसेल जनजागृती कार्यक्रम संपन्न
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : सिकलसेल सप्ताह या उपक्रमांतर्गत येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात सिकलसेल आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार पद्धती तसेच दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली. शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, धरणगाव येथील डॉ. शुभम जाधव व डॉ. तुषार मेटे यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेलसह विविध आजारांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत शंका निरसन केले. कार्यक्रमास शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील मयूर पाटील, परिचारिका सोनल व परिचारिका सुरेखा वसावे यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. एस. एस. पाटील व पर्यवेक्षक ए. एस. पाटील सर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस. एम. देशमुख, पी. पी. पाटील, के. एन. पाटील व भूषण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. पी. पाटील यांनी केले.

No comments