पाल येथे उत्तर महाराष्ट्र पाचवे पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील प...
पाल येथे उत्तर महाराष्ट्र पाचवे पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल येथे चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. वनप्रशिक्षण केंद्राच्या वास्तूत सलीम अली सभागृहात, मारुती चितमपल्ली व्यासपीठावर पूर्व आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद भागवत, उद्घाटक वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे आणि अन्य मान्यवरांच्या साक्षीने उद्घाटन झाल्यावर आयोजक संस्था चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन महाजन यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात या संमेलनाचे आयोजन संस्थेने जाणीवपूर्वक पाल येथे घेतल्याचे कारण विषद केले. उद्घाटक शेवाळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात वनक्षेत्र प्रशिक्षणाच्या वतीने आयोजित संमेलनाचे महत्व आणि उपयुक्तता सांगितली. पूर्व आमदार शिरीष दादा चौधरी यांनी निसर्गाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या कार्याचे कौतुक करून केव्हाही सहकार्य करण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.विनोद भागवत यांनी पक्षी निरीक्षण, वनराई संवर्धनाच्या कामात सातत्य ठेवण्याचे आवाहन करून होणारा कोणताही विरोध किंवा अडचणी यांनी निराश न होता संघटितपणे संवाद साधून सर्वांनी पुढेच जाण्याची तयारी ठेवावी यश येतेच असा विश्वास व्यक्त केला. या संमेलनात अनेक शोध कार्याची माहिती, निरीक्षणे, नोंदी... अशा उपक्रमांमधून उपस्थित लोकांचे नैसर्गिक, पर्यावरणीय उद्बोधन होणार असे संमेलनाच्या आयोजन समितीच्या सूत्रांकडून कळते. वनविभाग आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव तसेच अन्य अशासकीय संस्थांच्या निसर्गप्रेमी व्यक्तींच्या सहभागातून संपन्न होत असलेले हे संमेलन जनतेत निसर्ग, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात मौलिक जागृती निर्माण करेल असे अनेकांच्या अभिप्रायातून व्यक्त झाले.यावेळी राज्यभरातून 150 अभ्यासक उपस्थित होते. यावेळी अनिल महाजन पक्षी अभ्यासक शिरीष चौधरी माजी आमदार, डॉ विनोद भागवत संमेलन अध्यक्ष, हेमंत शेवाळे, संचालक दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था. डॉ महेश महाजन, शीतल नगराळे, वनपरीक्षेत्र अधिकारी पाल हे प्रमुख उपस्थित होते

No comments