adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोटेश्वर–जमनापुरी घाटात मोठी कारवाई; अवैध रेती वाहतुकीप्रकरणी ८ टिप्पर ताब्यात

 कोटेश्वर–जमनापुरी घाटात मोठी कारवाई; अवैध रेती वाहतुकीप्रकरणी ८ टिप्पर ताब्यात अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अवैध रेती...

 कोटेश्वर–जमनापुरी घाटात मोठी कारवाई; अवैध रेती वाहतुकीप्रकरणी ८ टिप्पर ताब्यात


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या रेती माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता कोटेश्वर–जमनापुरी घाट, मौजा नरवेल (ता. मलकापूर) येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले तब्बल आठ टिप्पर जप्त केले. या कारवाईत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी मलकापूर श्री. संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. तहसीलदार मलकापूर श्री. समाधान सोनवणे यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. गिरी साहेब यांच्यासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून रेती माफियांविरोधात ठोस पावले उचलली. या संयुक्त कारवाईत नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंतसिंग राजपूत (मलकापूर), व्ही. एन. कोल्हे (धरणगाव), तलाठी धीरज जाधव (मलकापूर), राहुल खर्चे (दसरखेड), महसूल सेवक पंकज जाधव, सचिन चोपडे तसेच पोलीस आरसीबी पथक सहभागी झाले होते.

प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नरवेल शिवारातील कोटेश्वर–जमनापुरी घाट परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित आठ टिप्पर थांबवून तपासणी केली असता संबंधितांकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व टिप्पर ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेले टिप्पर पुढीलप्रमाणे आहेत —

MH-28 BB-4172, MH-28 BB-7935, MH-28 BB-8910, MH-28 BB-2895, MH-28 BB-6174, MH-28 BB-7397, MH-28 BB-4414, MH-28 BB-1210.

नदी, घाट व पर्यावरणाची होत असलेली लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबले असून, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या धडक कारवाईतून देण्यात आला आहे. रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्यांनाही कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.

No comments