आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव...
आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विकास विभाग नाशिकच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची दि. १८ डिसेंबर रोजी यशस्वी सांगता झाली . कोणतेही गालबोट न लागता अतिशय निकोप वातावरणात हा तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला . बक्षिस वितरण व समारोपप्रसंगी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा , उपआयुक्त अरुणकुमार जाधव , सहायक आयुक्त निलेश अहिरे , विद्यापीठाचे उपकुलसचिव वसंत वळवी , नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार , धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील , कळवण प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर , सहायक प्रकल्प अधिकारी अनिल महाजन (नाशिक आयुक्तालय ) , नितीन भामरे ( तळोदा प्रकल्प ) , पवन सोनवणे ( धुळे प्रकल्प ) , नाशिक अपर आयुक्त कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील , हर्षवर्धन नाईक , निंबा कापडणीस , सुनील नेरकर , सहायक प्रकल्प अधिकारी आर.एस. साबळे ( कळवण प्रकल्प ) , अंबादास बागुल ( राजूर प्रकल्प ) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . समारोप समारंभाचे प्रास्ताविक यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले तसेच अध्यक्षीय भाषणात अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडा शिक्षक देण्याची घोषणा केली .
या तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान असलेल्या यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , पवन पाटील , संदीप पाटील , जावेद तडवी , मिनाक्षी सुलताने , लेखाधिकारी दिपकांत वाघ , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे , एल. एम. पाटील , विश्वास गायकवाड , मिलिंद पाईकराव , विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य , नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग , आश्रमशाळांचे मुख्याध्यापक , क्रीडा शिक्षक , अधिक्षक , अधिक्षिका , गृहपाल , वर्ग चार कर्मचारी या सर्व घटकांनी परिश्रम घेतले .
या विभागस्तरीय क्रीडा महोत्सवात १४ वैयक्तिक क्रीडा प्रकार व ६ सांघिक क्रीडा प्रकारांत एकूण ३०४४ आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांसह ४७२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला . सर्वसाधारण विजेतेपद कळवण प्रकल्पाला तर सर्वसाधारण उपविजेतेपद धुळे प्रकल्पाला प्राप्त झाले . नाशिक विभागातील सात प्रकल्पांमध्ये स्पर्धेचा यजमान असलेल्या यावल प्रकल्पाने गुणांकनानुसार तृतीय क्रमांक पटकावला . शांतपणे प्रदर्शन केल्याबद्दल राजूर प्रकल्पाला देखील फेयर प्ले ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले . सांघिक स्पर्धेत मुलामुलींच्या १४ वर्षे , १७ वर्षे , १९ वर्षे अशा तिन्ही गटात विजयी व उपविजयी संघाला एकेक ट्रॉफी अशा एकूण ६८ ट्रॉफी तर वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी एकेक मेडल असे एकूण १९२ मेडल पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या तीनही दिवसाचे थेट प्रक्षेपण युटूबवर प्रसारीत करण्यात आले .
१४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत यावल प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १४ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , १७ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १७ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १९ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , १९ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत नाशिक प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत नाशिकर प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी ठरले .

No comments