adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; विभागावर उत्तम कामगिरी

 सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; विभागावर उत्तम कामगिरी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-  हेमकांत गायकवाड) चोपडा:-  महाराष्ट्र...

 सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; विभागावर उत्तम कामगिरी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ सालाच्या शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील खेळाडूंसाठीच्या क्रीडा स्पर्धा दिनांक १६ ते १८डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.यामध्ये चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा सनपुले येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.वय वर्ष १७ आतील वयोगटात रिले क्रिडाप्रकारात ४×१००,४×४०० मध्ये व १९ वर्षातील स्पर्धेमध्ये ४×४०० रिले या क्रिडाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवत दोघेही संघ राज्यस्तरावर निवडण्यात आले आहेत.धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे २००व ४००मीटर  प्रकारात सयाराम मन्साराम बारेला या खेळाडूने दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले.अनिल बद्री भीलाला या खेळाडूने थाळीफेक क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक पटकावत  त्याचीही राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या यशाबद्दल प्रकल्पाधिकारी अरुणजी पवार,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील,सचिव गणेश भागवत पाटील,सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवन पाटील,सहाय्यक प्रकल्पाधिकारी संदीप पाटील,कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे,प्राथमिक मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पाटील तसेच क्रीडा शिक्षक ईश्वर पावरा,भूपेश पाटील,अश्विनी पवार आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments