adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपक्रम

 खामगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपक्रम  पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संजय ...

 खामगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उपक्रम 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संजय गांधी निराधार योजनेची नोंदणी करण्यात आली. यावेळी २१ प्रकारच्या दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास दिव्याताई, डॉ. अग्रवाल, काँग्रेसचे किशोरभाऊ, आप्पासाहेब भोसले, शिवसेना (उबाठा) महिला उपशहर प्रमुख पल्लवीताई पाटील, पत्रकार राजूभाऊ घाटे, देवगिरीताई, दिव्यांगशक्तीचे संपादक मनोजभाऊ नगर नाईक, पद्मगभाऊ धुरंदळ, चंदाताई दगाड, संध्याताई ताथोडे (प्रहार संघटना) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच निमित्ताने सोमवार, १५ डिसेंबर रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलम रोड (थेटे हॉस्पिटल शेजारी) येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दिव्यांगांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरात सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नितीन अग्रवाल व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शारदा अग्रवाल तपासणी करून योग्य सल्ला देणार आहेत. एक्स-रे तपासणीवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

दिव्यांग रुग्णांनी नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार जिल्हाध्यक्ष संभाजी राव टाले व विराट मल्टिप्लिके फाउंडेशनचे अध्यक्ष मनोजभाऊ नगर नाईक यांनी केले आहे.

संपर्क : 8605779986, 7281998933

No comments