आदिवासी कोळी महादेव समाजाचे आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मलकापूर:- मलकापूर नांदुरा य...
आदिवासी कोळी महादेव समाजाचे आमदार चैनसुख संचेती यांना निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- मलकापूर नांदुरा येथील विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री चैनसुख संचेती साहेब यांना भेटून आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांनी येत्या हिवाळी अधिवेशनात विधान सभागृहामध्ये कोळी समाज बांधवांना कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी इत्यादी जात प्रमाणपत्र व जात वैधता कोळी नोंदीवरून सुलभ पने मिळावी हा तारांकित प्रश्न उपस्थित करावा याची विनंती केली. समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा जाहीर पणे याबाबत सरकारला इशारा देण्यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर माननीय श्री दत्ता भाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यामधील समाज बांधव उपोषणासाठी बसणार आहेत तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या समाजाचा प्रश्न 2014 मध्ये दिलेल्या शब्दाला जागून त्वरित निकाली काढावा अन्यथा सर्व समाज बांधव प्राणांकित उपोषणासाठी सज्ज झालेले आहेत उपोषण कर्त्याच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी माननीय मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारची राहील असा सज्जड इशारा दिला आहे.

No comments