adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन

 मनवेल येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मनवेल ता यावल : येथील झेंडा गल्लीत १ जानेवारी...

 मनवेल येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मनवेल ता यावल : येथील झेंडा गल्लीत १ जानेवारी गुरुवार पासून सगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . 

मनवेल येथील झेंडागल्लीत गेल्या चार वर्षांपासून संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजीत केला जात असून या सोहळ्यात श्रीमद भागवत कथेचे वाचन हभप समाधान महाराज भोजेकर करणार आहे.

 १ जानेवारी २०२६ गुरुवारी  संगीत श्रीमद भागवत कथेला सुरुवात होणार होणार आहे यात हभप नारायण महाराज भडणेकर याच्या काल्याच्या कीर्तनाने दि ८ जानेवारी रोजी सांगता होणार आहे.

 या सप्ताहात  १ जानेवारी गुरुवार पासून दुपारी २ ते ५  भागवत कथा वाचन होईल तर ८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे ११ ते २ महाप्रसादचे आयोजन करण्यात आले तरी परीसरातील भावीकांनी संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या व महाप्रसादच्या लाभ घ्यावा असे आवाहन झेडागल्ली  व मनवेल ग्रामस्थांनी केले आहे.

No comments