adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेना मलकापूर तालुक्यातर्फे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, बुलढाणा, यांना निवेदन.

 शिवसेना मलकापूर तालुक्यातर्फे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, बुलढाणा, यांना निवेदन. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत ग...

 शिवसेना मलकापूर तालुक्यातर्फे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, बुलढाणा, यांना निवेदन.


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर: तालुक्यामधील आशा वरकर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा दिल्याबद्दल शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहनपर भत्ता तत्काळ अदा करण्याबाबत निवेदन. सविस्तर असे की शासन परीपत्रक गा.वि.वि.क्र. चोविआ-२०२०/प्र/क्र.४२/वित्त-४ दि. ३१ मार्च २०२०; तसेच शासन शुध्दीपत्रक गा.वि.वि. महाराष्ट्र शासन क्र. चोविआ-२०२०/प्र/क्र.४२/वित्त-४ दि. ०४ जुन २०२० अशी शासनाने विविध परिपत्रक आधीच काढलेले आहेत.

मलकापूर तालुक्यामधील आशा वरकर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुष सर्वे करणे, कोविड-१९ संबंधित ईतर कामे” अहोरात्र मेहनत घेऊन जिवाची पर्वा न करता केली, हे सर्वशृत आहे. त्या अनुषंगाने आशा वरकर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना मानधना व्यतिरिक्त कोरोना काळातील २३ महिन्यांसाठी दरमहा १०००/- रु. रक्कम प्रोत्साहनपर भत्ता शासनाने परिपत्रकाप्रमाणे देण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेले होते.

तरी आजवर मलकापूर तालुक्यामधील आशा वरकर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांना ग्रामपंचायत मार्फत प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही. ग्रामपंचायत अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असतात. 

याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बुलढाणा यांचे पत्र जा. क्र. बुजिप/साप्रवि/ग्रापं/अनुदानव/ ३८४३/ २०२५ दि. २०/१०/२५ याची अंबलबजावनी गट विकास अधिकारी, मलकापूर यांनी कुठेही केलेली नाही. दोन महीने होऊन देखील कसलीही कार्यवाही नाही. तरी मा. मु. का. अ. यांनी सक्तिचा आदेश काढून संबंधित अधिकार्‍याला कारणे मागावे असे निवेदनात नमूद आहे.

कोरोना काळात दिलेल्या सेवेचा मोबदला रु. रक्कम २३,०००/- प्रत्येकाला तत्काळ द्यावा नाही तर शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नंतरच्या परिणामास शासन जबाबदार राहील, असे तालुकाप्रुख यांनी स्पष्ट केले, निवेदन देते वेळी सोपान नारखेडे, निलेश सुशीर, कुलदीपसिंह राजपूत, ज्ञानेश्वर लवंगे किशोरसिंह राजपूत, पुरुषोत्तम पाटील, कैलास इंगळे, भगवान नारखेडे, गजानन सुशीर, सुभाष पाटील, प्रवीण तळोले, सोपान नारखेडे, प्रवीण पाचपोर, अतुल सिंह राजपूत, व दाताळा व पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments