चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात हिवाळी २०२५ च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. चोपडा प्रतिनिधी (संपादक ...
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात हिवाळी २०२५ च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(ता. चोपडा) –येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिंका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा या महाविद्यालयात हिवाळी २०२५ परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हिवाळी २०२५ च्या परीक्षेत विविध शाखांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यात विद्यार्थिनी अनन्या महेंद्र पाटील तृतीय वर्ष संगणक विभाग ९६.३५% गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तसेच स्थापत्य विभागातून हार्दिक राजेश पटेल ८६.१२% प्रथम व विद्युत विभागातून मयूर योगेश सुतार ९३.०६% प्रथम, यांत्रिकी विभागात गुणवंत देवाजी सावळे ८५.८२% प्रथम.आले यावेळी कार्यक्रमात पालक प्रतिनिधी दिपाली योगेश पाटील व रत्नाकर प्रल्हाद फेगळेकर,श्री एम.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिस्त व शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीचे, सातत्याचे व योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. आमचे प्राध्यापकवर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहेत." यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, प्रसंगी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, कार्यक्रमाचे समन्वयक श्री धनराज आर पाटील, श्री रोहित जी.शिंदे, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.के.चौधरी यांनी केले, हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

No comments