वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून गव्हाच्या शेतात गांजा, सातारा तालुका पोलिसांकडून शेतकरी ताब्यात एकुण.12 लाख रुपयांचा गांजा हस्तगत ! सं...
वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून गव्हाच्या शेतात गांजा, सातारा तालुका पोलिसांकडून शेतकरी ताब्यात एकुण.12 लाख रुपयांचा गांजा हस्तगत !
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एका शेतकऱ्याने वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून गव्हाच्या शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या पोलिस ठाणेकडील कर्मचाऱ्यासह पाली पो. रोहट जि. सातारा) येथे गुरुवारी दुपारी धडक छापा टाकला होता. यामध्ये शेतकरी नामे. नामदेव लक्ष्मण माने (वय 42 ) रा. पाली पो. रोहट ता.जि. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या कारवाईमध्ये सुमारे 12 लाख 81 हजार 275 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून कास तलावाच्या पलीकडे पाली या गावात या शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या शेतात गांजाची लागवड केली होती. दोनच महिन्यांपूर्वी शेतामध्ये गहू पेरला होता. आणि त्याच कालावधीत गव्हाच्या पिकात ठिकठिकाणी लहान-मोठी गांज्याची रोपे लावली होती. अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून लागवड केल्याचे सांगितले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याने याचा हेतू भलताच असावा असेही पोलिसांचे म्हणणे होते. रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाणेत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती अधिक तपास स.पो.नि. सुदर्शन काटकर करीत आहेत. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकांचे विनोद नेवसे स.पो.नि.सुदर्शन काटकर स.पो.नि. रूपाली मोरे सफी. धनाजी वायदंडे मनोज गायकवाड राजू शिखरे पंकज ढाणे दादा स्वामी सतीश बाबर प्रदीप मोहिते मालोजी चव्हाण किरण जगताप संदीप पांडव सुनील भोसले सचिन इनकार मोहन नाचण प्रशांत ताटे मारुती अडागळे अमोल निकम यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. सातारा तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुकांची थाप देण्यात आली आहे.

No comments