adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौर कृषी पंप सर्वेक्षणासाठी लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ रंगेहात पकडले. ला.प्र.विभाग नंदुरबार पोलिस उप अधीक्षक प्रशांत भरते यांची पथकासह पारोळ्यात कारवाई

 सौर कृषी पंप सर्वेक्षणासाठी लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ रंगेहात पकडले. ला.प्र.विभाग नंदुरबार पोलिस उप अधीक्षक प्रशांत भरते यांची ...

 सौर कृषी पंप सर्वेक्षणासाठी लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ रंगेहात पकडले.

ला.प्र.विभाग नंदुरबार पोलिस उप अधीक्षक प्रशांत भरते यांची पथकासह पारोळ्यात कारवाई 


नंदुरबार प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतातील विहिरीचे सर्वेक्षण करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी चोरवड, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीचे नाव भाऊसाहेब गोरख पाटील (वय ३३) असून तो वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण, मर्यादित पारोळा, जि. जळगाव (वर्ग-३) येथे कार्यरत आहे. आरोपीने विहिरीच्या सर्वेक्षणासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडे १,५०० रुपयांची लाच मागणी केली होती, तडजोडीनंतर १,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

मुळ तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी दिनांक २१/०६/२०२५ रोजी आपल्या पत्नीच्या नावाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मौजे पोपटनगर शिवार, पारोळा येथील शेतासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. महावितरणकडून विहिरीच्या सर्वेक्षणासाठी २०/०९/२०२५ रोजी तारीख देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी आरोपी तंत्रज्ञाने लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार येथे दिनांक ०८/०१/२०२६ रोजी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपीने लाचेची मागणी कायम ठेवत १,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आरोपीला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत भरते यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली असून तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास त्वरित संपर्क साधावा.

No comments