adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्रामपंचायत कारभाराला ग्रहण! भगवान चौधरी यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; गट विकास अधिकारी यांचे कडक आदेश

 ग्रामपंचायत कारभाराला ग्रहण! भगवान चौधरी यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; गट विकास अधिकारी यांचे कडक आदेश  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 ग्रामपंचायत कारभाराला ग्रहण!

भगवान चौधरी यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; गट विकास अधिकारी यांचे कडक आदेश 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बेजबाबदार व ढिसाळ कारभाराची तक्रार माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केली असून,त्यांच्या तक्रारीनंतर अखेर पंचायत समिती प्रशासनाला जाग आली आहे.नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या मनमानीविरोधात गट विकास अधिकारी,पंचायत समिती जळगाव यांनी तात्काळ व कडक आदेश जारी केले आहेत.ग्रामपंचायत कार्यालये कागदावर सुरू आणि प्रत्यक्षात बंद, हीच अनेक गावांची दैनंदिन वस्तुस्थिती असल्याचा आरोप चौधरी यांनी तक्रारीत केला होता. “मिटींग आहे”, “पंचायत समितीत काम आहे” अशी सर्रास कारणे देत ग्रामसेवक गायब राहत असून, दाखले, कर भरणा, योजना लाभ यासाठी सामान्य नागरिकांना वारंवार अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत असल्याचे गंभीर वास्तव तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या तक्रारीची गंभीर दखल घेत गट विकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींना QR Code / Biometric Attendance System लागू करण्याचे आदेश दिले असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.३० या वेळेत कार्यालय सुरू ठेवणे आता कागदापुरते नव्हे तर प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.या आदेशाचे श्री चौधरी यांनी स्वागत केले असुन यापुढे ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी गैरहजर आढळल्यास “कारण सांगून सुटका” होणार नसून, संबंधितांवर थेट शिस्तभंग व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या ग्रामसेवकांनी उपस्थितीचा तपशील दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.नागरिकांमध्ये मात्र, आदेश निघाले म्हणजे प्रश्न सुटले असे नाहीत, अशी तीव्र भावना असून दोषी ग्रामसेवकांवर प्रत्यक्ष कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अन्यथा ग्रामपंचायतींतील  निष्क्रिय कारभार पुन्हा जैसे थे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

No comments