adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्यात संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर, 12 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त:- पोलीस आयुक्त डॉ. अमितेशकुमार

  पुण्यात संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर, 12 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त:- पोलीस आयुक्त डॉ. अमितेशकुमार  (पुणे शहर) संभाजी ...

 पुण्यात संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर, 12 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त:- पोलीस आयुक्त डॉ. अमितेशकुमार 


(पुणे शहर) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात गुरुवारी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर तसेच उपनगरांत 125 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर 90 संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस आयुक्त डॉ. अमितेशकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तांची आखणी करण्यात आली होती. उपनगरांत तीन हजार 983 मतदान केंद्र (बुध) आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात होता. शहरांतील 913 इमारतीत मतदान करण्यात आले तेथेही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शहरांत 14 पोलीस उपायुक्त 30  सहायक पोलीस आयुक्त 166 पोलीस निरीक्षक 723 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर गृहरक्षक दलाचे तीन हजार 250 जवान राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

No comments