धाराशिव जिल्हा हादरला, आईच्या अनैतिक संबंधाची बापाला माहिती देईल, म्हणून चुलत्याने 13 वर्षीय पुतण्याला संपविले (धाराशिव जिल्हा) संभाजी पु...
धाराशिव जिल्हा हादरला, आईच्या अनैतिक संबंधाची बापाला माहिती देईल, म्हणून चुलत्याने 13 वर्षीय पुतण्याला संपविले
(धाराशिव जिल्हा) संभाजी पुरी गोसावी प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यांतील तामलवाडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपलीच आई आणि काका यांच्यात अनैतिंक संबंध असल्याची माहिती 13 वर्षीय पुतण्या कृष्णा पोहोचवत असल्याच्या रागांतून चुलत्यानेच आपल्या 13 वर्षीय पुतण्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (ओमकार देविदास कांबळे) असे आरोपींचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीचे आपल्याच भावजय सोबत अनैतिक संबंध होते तो भावजय सोबत सालगडी म्हणून काम करीत होता. या दोघांचे अनैतिक संबंध हे पुतण्या म्हणजेच ज्योती कांबळे हिचा मुलगा कृष्णा याला माहीत होतं. याच बाबतीत वडिलांना माहिती दिल्याच्या रागांतून त्याचा खून करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी 24 तासात आरोपीं काकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी शिवारांत कदम यांची शेती आहे ती शेती दत्ता कोरे हा बटईने करीत होता. आणि सदर ठिकाणी आरोपी ओंकार देविदास कांबळे हा आपल्या भावजयला घेवुन चालगडी म्हणून कामास होता. भावजय ज्योती कांबळे यांचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडिलांकडे तर कधी आईसोबत राहायचा त्यामुळे आपल्या आईची आणि काकाची प्रेम कहाणी त्याला माहीत होती. मात्र कृष्णा हा दिर भावजय च्या अनैतिक संबंधात अडसर ठरु लागला होता. याचाच राग आरोपीं काकाच्या मनात होता. अखेर त्यांने आपल्या अनैतिक संबंधासाठी 13 वर्षीय पुतण्याचा खून करून संपविले आहे. सदरच्या कामगिरीत जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह जुबेर काझी दिनकर तागे सुरज नरवडे उमेश माने नजीर बागवान तुराब शेख हनुमंत कोरे नितीन भोसले आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments