कर्तव्यावर असताना वीरमरण, अकोला जिल्ह्यातील वैभव लहाने जम्मू-काश्मीर कुपवाडा येथे शहीद ! संभाजी पुरीगोसावी (अकोला जिल्हा) प्रतिनिधी. (सं...
कर्तव्यावर असताना वीरमरण, अकोला जिल्ह्यातील वैभव लहाने जम्मू-काश्मीर कुपवाडा येथे शहीद !
संभाजी पुरीगोसावी (अकोला जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यांतील जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना जम्मू-काश्मीर कुपवाडा सेक्टरमध्ये वीरमरण आले आहे.12 मराठा इन्फंट्रीतील या शूरवीर जवानाला अकोला जिल्ह्याने जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. (मेसचे डबे देवुन आईने वैभवचे शिक्षण पूर्ण केले होते.) वैभव लहाने यांचे बारावीपर्यंत शिक्षण कपिलेश्वर वडद आणि अकोला येथे पूर्ण झाले होते. गावात त्याचे छोटे छोटेखानी घर आणि एक एकर शेती आहे. वैभव चे बालपण हे त्याच्या मामाच्या गावी गेले होते. त्याच्या पश्चात आई-वडील बहिण भाऊ असा परिवार आहे. तर त्याचा लहान भाऊ गौरव लहाने भारतीय देशसेवेत कार्यरत आहे.
अकोला जिल्ह्यातील देशसेवेत कर्तव्यावर असताना अकोला जिल्ह्यातील सुपुत्र वीर जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. दि. ७ जानेवारी २०२६ रोजी ते शहीद झाले. त्यांचे मूळगांव कपिलेश्वर (पो. वडद, ता. अकोला) असून, त्यांचे पार्थिंव ९ जानेवारी रोजी दु. १ पर्यंत कपिलेश्वर येथे पोहोचेल. शासकीय मानवंदना मानवंदना देवुन जवान वैभव लहाने यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मिळाले आहे.

No comments