वर्डी येथे विद्यार्थ्यांनी घेतला शस्त्र चालवण्याचा अनुभव रविंद्र कोळी ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 8/1/2026 गुरुवार रोजी ...
वर्डी येथे विद्यार्थ्यांनी घेतला शस्त्र चालवण्याचा अनुभव
रविंद्र कोळी ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 8/1/2026 गुरुवार रोजी स्वा. सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त अडावद पोलीस स्टेशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या सप्ताहा अंतर्गत " शस्त्रास्त्र मार्गदर्शन शिबिर" आयोजित करण्यात आले. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ उपस्थित होते. त्यांच्यासोबत सहाय्यक फौजदार श्री जितेंद्र सोनवणे, पोलीस हवालदार किरण शिरसाठ, सेवराव तोदे, चंदुलाल सोनवणे, पोलीस नाईक विनोद धनगर, दिलीप पाटील, वर्डी गावाचे पोलीस पाटील श्री पद्माकर नाथ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी जय हिंद चा जयघोष करून उपस्थित पोलीस विभागातील मान्यवरांचे उस्फुर्त स्वागत केले.
ए पीआय श्री प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस व पोलीस अधिकारी, गणवेश, त्यावरील चिन्ह व पोलीस पदे, महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी उत्सुकता निर्माण केली.
श्री जितेंद्र सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कार्बाईन गन, एस एल आर रायफल, गॅस गन, पिस्टल, हॅन्ड ग्रेनेड, स्टंट ग्रेनेड, मिरची स्प्रे व दंगा नियंत्रण वेळी आवश्यक साहित्य यांचा उपयोग व रचना याविषयी माहिती दिली. आणि शस्त्र चालवण्याचे प्रात्यक्षिक स्वतः दिले. आणि विद्यार्थ्यांनाही शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी वरील शस्त्रास्त्र स्वतः हाताळून पाहिले व शस्त्रास्त्र चालवण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शंका व प्रश्न उपस्थित केले. व साहेबांनी त्यांची उत्तरे दिली. प्रश्नोत्तर सत्रा नंतर मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानले.

No comments