अंतुर्ली जनता विद्यालयाच्या 1978 च्या एस एस सी बॅच विद्यार्थी विद्यार्थिनीचे स्नेहसंमेलन उत्साहात किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमका...
अंतुर्ली जनता विद्यालयाच्या 1978 च्या एस एस सी बॅच विद्यार्थी विद्यार्थिनीचे स्नेहसंमेलन उत्साहात
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथील जनता विद्यालयाचा आताचे मी. फ तराळ विद्यालय व मंगू रामजी महाराज जुनियर कॉलेज च्या सन 1978 ज्या दहावीच्याविद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन तब्बल 48 वर्षांनी कुसमताई इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सुरुवातीला प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील आतापर्यंतचा प्रवास सुखदुःख विस्तृत स्वरूपात मांडले शालेय आठवणींना उजाळा दिला शाळेमधील गमती जमती मस्ती सांगून धमाल केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस ए भोई सर होते. प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक जे आर तराळ सर,एम बी महाजन सर, बी.बी.पाटीलसर,एस डब्ल्यू पाटीलसर, एस एस तायडेसर, मोकाशे सर होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय कोसोदे यांनी केले.
माजी विद्यार्थी आर.सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेज शिरपूर चे डायरेक्टर जयंतराव पाटील सर, ह .भ.प . मनोहरदेव महाराज, एल आय.सी.डेव्हलपमेंटऑफिसर विजय कोसोदे ,सेवानिवृत्त प्रा. दुर्गादास पुना पाटील, जी . डी पाटील सर, भोपाल सौ.संगीताताई दर्यापूरकर कळमकर, सौ.वंदनाताई मोपारी निकाडे, लीलाताई कोसोदे,उद्योजक चव्हाण, पोस्टमास्टर संतोष बावस्कर,डॉ. प्रकाश महाजन, प्रगतिशील शेतकरी मधुकर महाजन, विठ्ठल पारख, तायडे सर, प्रभाकर टोंगळे सर, दिलीप गावंडे,ज्ञानेश्वर दलपत पाटील, अशोक राजाराम महाजन,प्रकाश किसन महाजन, दिगंबर भागवत महाजन, अरुण पाटील, इच्छापूर , चापोरा,माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणी उपस्थित होते. स्नेहसंमेलनास उपस्थित सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना विजयकुमार कोसोदे यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात आले. सर्व मान्यवर गुरुजनांनी उपस्थित सर्वांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments