वर्डी जिल्हा परिषद शाळेला लेझीम साहित्याची भेट; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चोपडा (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वर्डी येथ...
वर्डी जिल्हा परिषद शाळेला लेझीम साहित्याची भेट; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चोपडा (प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्या शोभा कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजपूजन शालेय समितीच्या उपाध्यक्षा कांता कोळी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमप्रसंगी सरपंच शोभा पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राहुल ठाकरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माजी उपसरपंच उज्ज्वल सुखदेव शिंदे उपस्थित होते. याचवेळी उज्ज्वल सुखदेव शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवायत व शारीरिक विकासासाठी लागणारे लेझीम साहित्य स्वतःच्या खर्चातून शाळेला भेट स्वरूपात प्रदान केले.
या लेझीम साहित्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम कवायतमध्ये उत्साहात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना लेझीम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी उज्ज्वल सुखदेव शिंदे यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक संदीप महाजन यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.

No comments