adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर काँग्रेसच्या चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंगाचा आरोप

 फैजपूर काँग्रेसच्या चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंगाचा आरोप  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील ...

 फैजपूर काँग्रेसच्या चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंगाचा आरोप 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील पक्षशिस्त भंगाप्रकरणी फैजपुर नगर परिषदेतील काँग्रेसच्या चार नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पक्षाच्या बैठकीत ठरलेल्या नावाऐवजी दुसरे नाव सुचविण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून संबंधितांनी सात दिवसात खुलासा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाध्यक्षांनी दिला आहे प्रभाग क्रमांक 1 मधील हकीम एमत तडवी प्रभाग क्रमांक 2 मधील सादेका बी शेख दानिश प्रभाग क्रमांक 7 मधील प्रियंका ईश्वर इंगळे आणि प्रभाग क्रमांक 8 मधील शेख इरफान शेख इकबाल यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित नगरसेवकांनी सात दिवसात लेखी उत्तर द्यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला असून जिल्ह्यात पक्षविरोधी कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही अशी तंबीही जिल्हाध्यक्ष पवार यांनी दिली आहे. पक्षशिस्तभंगाचा आरोप 

 नामनिर्देशित सदस्याच्या शिफारशीसाठी झालेल्या पक्ष बैठकीत डॉ. शेख दानिश शेख निसार यांच्या नावावर एकमत झाले होते मात्र गटनेते शेख इरफान शेख इकबाल यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन भाजपचे पवन अनिल सराफ यांचे नाव सुचविल्याचा आरो प त्यांच्यावर करण्यात आला आहे.आज दि. २९ जानेवारी रोजी वरील चौघे नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेले आहेत. असे फैजपूर काँग्रेस शहर अध्यक्ष शे. रियाज यांनीही माहिती देताना सांगितले.

No comments