अकलूज पोलिसांची दमदार कामगिरी! 20 लाखांचा मुद्देमालसह गुजराती चोरट्यांच्या अकलूज पोलिसांनी आवळल्या मुसक्या संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल...
अकलूज पोलिसांची दमदार कामगिरी! 20 लाखांचा मुद्देमालसह गुजराती चोरट्यांच्या अकलूज पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील बी.एस. कन्सट्रकशन कार्यालयाच्या डावरमधील जवळपास 5 लाख 45 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद आनंद भोसले यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून अखेर अकलूज पोलिसांनी गुजरात राज्यांतील तिघा आरोपींच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांना आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह अकलूज पोलीस ठाण्यातील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. अकलूज पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments