रोहनभाऊ भंजकर हा मराठी कष्टकरी माणसाचा बुलंद आवाज! एकजुटीने मतदान करा – भैया भाऊ खारोडे यांचे आक्रमक आवाहन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -...
रोहनभाऊ भंजकर हा मराठी कष्टकरी माणसाचा बुलंद आवाज!
एकजुटीने मतदान करा – भैया भाऊ खारोडे यांचे आक्रमक आवाहन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा : बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी झालेला रोहनभाऊ भंजकर हा केवळ स्पर्धक नसून तो मराठी कष्टकरी माणसाचा बुलंद आवाज आहे. त्याच्या विजयासाठी प्रत्येक मराठी माणसाने एकजुटीने उभे राहावे, असे आक्रमक आवाहन छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानचे भैया भाऊ खारोडे जि एम फिटनेस सेंटर संचालक योगेशजी पांडे यांनी केले आहे.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून, प्रचंड संघर्ष करत रोहनभाऊ भंजकर यांनी हा प्रवासष गाठला आहे. स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला हा युवक आज लाखो गरीब, शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील तरुणांचे प्रतिनिधित्व करत आहे. अशा व्यक्तीला पाठिंबा देणे ही केवळ मतदानाची बाब नसून ती मराठी स्वाभिमानाची लढाई असल्याचे खारोडे यांनी ठामपणे सांगितले.
“आज जर मराठी माणूस एकत्र आला नाही, तर मेहनतीचा अपमान होईल. ही वेळ गप्प बसण्याची नाही. प्रत्येकाने मोबाईल उचलून, घराघरातून मतदान करत रोहनभाऊ भंजकर यांना विजयी करावे,” असे आक्रमक शब्दांत त्यांनी स्पष्ट केले.
रोहनभाऊ भंजकर यांच्या यशामुळे ग्रामीण व गरीब कुटुंबातील तरुणांना नवी दिशा मिळत असून, कष्ट, जिद्द आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर कोणतीही लढाई जिंकता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

No comments