adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या तरूणांच्या नातेपुते पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

 अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या तरूणांच्या नातेपुते पोलिसांनी आवळल्या मुसक्या !   संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनि...

 अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या तरूणांच्या नातेपुते पोलिसांनी आवळल्या मुसक्या !  


संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नातेपुते पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था = 2026 अनुषंगाने पोलीस पेट्रोलिंग मध्ये वाढ केलेली आहे. गुन्हे त्यादरम्यान बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिंगणापूर पाटीं येथील हॉटेल गोल्डन ईरा परिसरांत काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी सापळा रचला.पहाटे 01.35 च्या सुमारांस संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका इसमाला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची दोन पंचसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मिळून आले.

अटक करण्यात आलेला आरोपी:

नाव: गौरव पोपट होळकर (वय ३१)

रा. मु.पो.१० फाटा, होळ ता. बारामती जि. पुणे)

जप्त केलेला मुद्देमाल: १) गावठी पिस्तूल: ४५,००० रुपये किंमतीचे सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल  (ज्याला लाल रंगाचा स्टार आणि काळ्या रंगाची प्लास्टिक पट्टी आहे).

२) काडतुसे: ०३ जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन.

त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/562 राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस  ठाणेस गुरनं 22/2026 शस्त्र अधिनियम कायदा कलम 3,25 प्रमाणे* दिनांक 26/01/2026 रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोफौ/ सतीश पाटकुलकर हे करीत असून सदर अवैध शस्त्र कुठून आणले? कोण कोण साथीदार आहेत त्याबाबत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे. सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकांतील पोसई/ सोनल मोरे, पोलीस  हवालदार राहुल रुपनवर देविदास धोत्रे,पोलीस नाईक राकेश लोहार, पोका / रणजित मदने,पोका/ रमेश बोराटे चापोका/ संतोष वारे व राहुल वाघमोडे गोरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. नातेपुते पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments