adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळी अनुदान वाटपात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी रखडल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

 दुष्काळी अनुदान वाटपात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी रखडल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा  भुसावळ (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गा...

 दुष्काळी अनुदान वाटपात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशी रखडल्याने 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा 


भुसावळ (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी सन 2024-25 मध्ये वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात येऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने, दि.26 जानेवारी रोजी भुसावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दुष्काळी अनुदान वाटप करताना तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा उतारे व पंचनाम्यांमध्ये फेरफार करून ज्या व्यक्तींची शेती अस्तित्वात नाही, अशा व्यक्तींच्या बँक खात्यात अनुदान जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोषींवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत केदारनाथ सानप यांनी दि.4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता.

या तक्रार अर्जाची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दि.5 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अधिकारी, भुसावळ विभाग यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, आदेश देऊनही आजपर्यंत कोणतीही चौकशी किंवा पुढील कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, दि.12 जानेवारी 2026 रोजी सानप यांनी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील दुष्काळी पंचनामे व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तसेच अनुदान वितरणाचा संपूर्ण तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितला होता. मात्र दि.23 जानेवारी 2026 रोजी ही माहिती देण्यात न येता अर्ज निकाली काढण्यात आला. यावरून अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय अधिक बळावतो असून, यामुळेच संबंधित अधिकारी व कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दि.26 जानेवारी 2026 रोजी भुसावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना ई-मेलद्वारे तर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले आहे.

No comments