माजी मंत्री अमित देशमुख: अनेक मित्रांना सोबत घेऊन काँग्रेस जि. प. निवडणुकीत ताकदीनिशी उतरली! बंडखोरांची ही मनधरणी करू : आमदार अमित देशमुख....
माजी मंत्री अमित देशमुख: अनेक मित्रांना सोबत घेऊन काँग्रेस जि. प. निवडणुकीत ताकदीनिशी उतरली!
बंडखोरांची ही मनधरणी करू : आमदार अमित देशमुख.
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अनेक मित्रांना घेऊन काँग्रेस पक्ष ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. पक्षात कुठेही बंड झाल्याचे चित्र नाही, एखाद्याने उमेदवारी अर्ज भरला असेल तर त्याची मनधरणी करून सोबत घेतले जाईल, अशी भूमिका काँग्रेसचे माजी मंत्री (माजी मंत्री अमित देशमुख) आमदार अमित देशमुख यांनी आज माध्यमांसमोर मांडली.
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सर्व विरोधकांना एकत्र घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरेल काय? याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर बोलताना आमदार देशमुख (माजी मंत्री अमित देशमुख) म्हणाले की, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, जयंत पाटलांची शेकाप, महादेव जानकर यांची रासप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षासोबत काँग्रेसची आघाडी झाली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार केला. त्याचा अनुभव लातूर जिल्ह्याला आहे. मध्यंतरीच्या काळात ज्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार केला,तो लातूर जिल्ह्यातील जनतेला रुचला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार काँग्रेसच्या बाजूने उभारलेला असेल, असा विश्वास आमदार देशमुख ( माजी मंत्री अमित देशमुख) यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments