adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर तालुका पोलीस नेहमीच प्रयत्नशील, शेळ्या चोरी प्रकरणात तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, एकुण 61.5000 मुद्देमाल हस्तगत !

  पंढरपूर तालुका पोलीस नेहमीच प्रयत्नशील, शेळ्या चोरी प्रकरणात तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, एकुण 61.5000 मुद्देमाल हस्तगत !   (सोलापूर जिल...

 पंढरपूर तालुका पोलीस नेहमीच प्रयत्नशील, शेळ्या चोरी प्रकरणात तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, एकुण 61.5000 मुद्देमाल हस्तगत ! 


 (सोलापूर जिल्हा)  सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये शेळ्या चोरी प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन आरोपींकडून एकूण सहा शेळ्या एक विवो कंपनीचा मोबाईल रोख रक्कम व टेम्पो /615000/ रुपयांचा एकूण सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी येथे (दि. 2 जानेवारी ) रोजी पहाटेच्या सुमारांस अज्ञात-चोरांनी लक्ष्मी टाकळी गावात शेळ्या चोरून नेल्या होत्या तसेच 12 जानेवारी 2026 रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेल्या होत्या. त्याबाबत समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून अज्ञातचोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल होता . त्याबाबत सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना सोबत घेवुन उमदी येथील गावात जावुन सखोल तपास केला असता सदर शेळ्या चोरी प्रकरणात खालील नमूद नावाच्या महिलांना ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता खालील नमूद महिला चोराकडून पंढरपूर तालुका पोलिसांनी शेळ्या जप्त केल्यात

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2026 बीएनएस कलम 303 मध्ये आरोपी 1)नामे माधुरी भानुदास चव्हाण (वय 38) रा.माळीनगर) 2)अंबिका सोमनाथ काळे (वय 38) रा.सवतगाव तालुका माळशिरस ) यांचेकडे तपास करून तिसरा आरोपी उदय विजय  काळे (वय 21) रा. सवतगांव) यास ताब्यामध्ये घेवुन सदर आरोपी कडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुन्ह्यातील 6 शेळ्या  एक विवो कंपनीचा मोबाईल वएक टेम्पो रोग रक्कम असा असा एकूण 615000.           सहा लाख-15 हजार रुपये रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपींकडून हस्तगत केला आहे. सदर आरोपींकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

सदर आरोपी उदय विजय काळे (वय 21) रा. सवतगांव)  याचे ताब्यातून एकूण चार शेळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्या फिर्यादी समाधान बाबर यांनी ओळखलेले आहेत सदर आरोपी हा सध्या पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 27/26 मध्ये पोलीस कस्टडीत आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर, API शहाजी गोसावी,  पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले एएसआय रमेश  बनसोडे आबासाहेब शेंडगे सुधाकर हेंबाडे संजय गुटाळ सागर गवळी महिला पोलीस  चोपडे चालक पोलीस हसन नदाफ विलास घाडगे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments