adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दल चोपडा शौर्य दिवस साजरा

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दल चोपडा शौर्य दिवस साजरा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दल चोपडा शौर्य दिवस साजरा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल शाखा चोपडा शहर व तालुका यांच्या वतीने 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    यावेळी नगरसेविका वंदना सुधाकर बाविस्कर, रमेश ज्ञानोबा शिंदे नगरसेवक अशोक राजाराम बाविस्कर माजी नगरसेवक व बापूराव गिरधर वाने अध्यक्ष भारती बौद्ध महासभा चोपडा यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण,पंचशील, बुद्ध वंदना, भीमस्मरण, भीम स्मृति, हे सामुदायिक वंदना घेण्यात आली.तसेच समता सैनिक दलाचे प्रमुख मेजर एस.व्ही.करंदीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विजय स्तंभासमोर मेनबत्ती,अगरबत्ती, शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ व तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी विजय स्तंभाला मेजर एस. व्ही.करंदीकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून शूरवीर शहिदांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली. 


      सदर कार्यक्रमाला वंदना सुधाकर बाविस्कर सुनंदा समाधान सपकाळे, रमेश शिंदे, अशोक राजाराम बाविस्कर, कैलास सोनवणे, तसेच शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ तालुका अध्यक्ष बापूराव गिरधर वाणे, जिल्हा संघटक सुदाम करंकाळ, अशोक शिरसाठ, महेंद्र सोनवणे, सुनील शिरसाठ, सुखदेव बाविस्कर, समाधान सपकाळे, प्रविण करंकाळ, वसंत शिंदे, पुंडलिक भालेराव, जानकीराम सपकाळे, रमेश सोनवणे, देवानंद वाघ, आदी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, उपासक, उपासिका व तमाम बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या उपस्थित होते.

No comments