adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सयंम व काळजी हेच सुरक्षित प्रवासाचे ध्येय; तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा आगारात सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन

 सयंम व काळजी हेच सुरक्षित प्रवासाचे ध्येय; तहसीलदार भाऊसाहेब थोरात  चोपडा आगारात सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...

 सयंम व काळजी हेच सुरक्षित प्रवासाचे ध्येय; तहसीलदार भाऊसाहेब थोरात 

चोपडा आगारात सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.१) रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असुन राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित सेवा करणारे महामंडळ आहे म्हणुनच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरक्षितता अभियान राबविले जाते"चोपडा आगारात सन २०२६ अंतर्गत १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमासाठी, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शितल दिदि, करीष्मा दिदी पालक अधिकारी संदेश क्षिरसागर,नगर वाचन मंदीर चे सदस्य प्रभाकर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.रस्ता वाहतुकीत  सुरक्षित प्रवास महत्वाचा भाग आहे.यात चालकांनी मनाची एकाग्रता व प्रवाशांचा एस टी चालकावर असलेला विश्वास डोळ्यासमोर ठेवुन वाहन चालवले तर निश्चितच अपघात विरहित सेवा देवु शकता व आज ही एस टी वरील विश्वासार्हता टिकुन आहे असे  तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी चालकांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त करताना केले.यावेळी शितल दिदि, प्रभाकर महाजन, यांनी कर्मचाऱ्यांना प्रबोधन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुत्रसंचलन भगवान नायदे यांनी तर आभार आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी मानले.यावेळी वाहतुक निरीक्षक स.का.अ सिध्दार्थ चंदनकर,लेखाकार ईश्वर चौधरी, परेश बोरसे चंद्रभान रायसिंग,रिना पाटील,सविता कोळी, राजश्री परदेशी, निर्मला सोनवणे, वृषाली बैसाणे संगिता पाटील, संदिप पाटील, रिजवान सैय्यद सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments