adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात हवामान बदल आणि युवकांची भूमिका विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

 यावल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात हवामान बदल आणि युवकांची भूमिका विषयावर प्रेरणादायी व्याख्यान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हे...

 यावल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात हवामान बदल आणि युवकांची भूमिका विषयावर प्रेरणादायी व्याख्यान


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

         कवयित्री बहिणाबाई चौधरी,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,यावल येथे प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि.०२ जानेवारी २०२६ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत दत्तक गाव सांगवी येथे आयोजित करण्यात आले आहे.

             शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर  शिबिराच्या दुसऱ्या सत्रात “हवामान बदल आणि युवकांची भूमिका” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांनी तरुण पिढी ही हवामान बदलाच्या परिणामांना सर्वाधिक सामोरे जाणारी आहे आणि त्यांच्यात प्रचंड ऊर्जा व नाविन्यपूर्ण क्षमता आहे. त्यामुळे, त्यांना योग्य व्यासपीठ आणि समर्थन मिळाल्यास, ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.तर रोसेयो मधील स्वयंसेवकांनीही हवामान बदलात समाजामध्ये जागृत निर्माण करण्यासाठी तप्तर व्हावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वयंसेविका कृष्णा विनोद पाटील हया होत्या.त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी आपल्या जीवन काळात बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे असे सांगितले.

           या प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.व्ही. पावरा,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी.वसावे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एस.शिरसाठ,प्रा.पी.व्ही. रावते श्री.प्रमोद जोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भार्गवी पराग बावस्कर हिने केले,तर पाहुण्यांचा परिचय  दुर्गा चंद्रकांत पाटील हिने करून दिला. व आभार डिंपल मुकेश भालेराव हिने मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments