adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई जयंती (बालिका दिवस )साजरा

 जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई जयंती (बालिका दिवस )साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 3...

 जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई जयंती (बालिका दिवस )साजरा


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 3/1/2026 रोजी व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई   जयंती  (बालिका दिवस )साजरा करण्यात आला.

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या  सौ रंजना महाजन मॅडम व दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या. 

       कार्यक्रमाला पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम यांनी उपस्थिती दिली.

      अध्यक्षाच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .तसेच विद्यार्थिनींनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले. 

        तसेच शाळेच्या शिक्षिका गायत्री चौधरी मॅडम व मनीषा पाटील मॅडम यांनी सावित्रीबाई फुले विषयी माहिती सांगितली. तसेच शाळेच्या विद्यार्थिनीं  बशीमा  शेख व नीलिमा पाटील यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले विषयी माहिती दिली.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रीती भार्गव मॅडम यांनी केले. 

      तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

No comments