२४-२५ चा पिक-विमा व उर्वरित अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक.....! मागण्या मान्य न केल्यास तुपकरांच्या नेतृत्वात आं...
२४-२५ चा पिक-विमा व उर्वरित अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक.....!
मागण्या मान्य न केल्यास तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन :- अक्षय पाटील
जळगाव (जा.) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव (जा.) :- तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप २०२४-२५ चा पिक विमा काढलेला आहे. मात्र पिक विमा कंपनी अजुनही पिक-विमा देण्यास टाळाटाळ करत आहे. खरंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात आहे.त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढल्याचे दिसून येते. शेतकरी वारंवार पीक-विमा कंपनी व शासनाकडे पिक-विमा मिळावा यासाठी तक्रारी,आंदोलने करीत आहेत मात्र पिक विमा-कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा टाकायला तयार ही बाब अतिशय निंदनीय आहे.तरी पिक-विमा कंपनी व शासनाने या विषयाला गांभीर्याने घेऊन त्वरित पिक विमा जमा करावा. तसेच अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे अजुनही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही ती अतिवृष्टीची मदत तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनेक शेतकऱ्यांचे पैसे विस्कळीत पडलेले आहे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत.
सदर मागण्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या असुन रास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज दिनांक ८/१/२०२६ रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, अनीलसींह राजपुत,वैभव जाणे, आकाश आटोळे, जितेंद्र चाहेल, युवा तालुकाध्यक्ष अमोल बहादरे, अजहर शेख, सय्यद शेख,सोपान पाटील, सदाशिव जाणे, अमोल सोनवणे, भिकाजी जाधव, त्रिलोकसिंग राजपूत, संदीप वाघ, संतोष गणगे, गजानन अढाव, पप्पू पोटे,अमोल घुळे तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.



No comments