शिर्डी दर्शनासाठी आलेल्या भाविकाची बॅग चोरणारे आरोपी पकडले..आयफोनसह परकीय चलन हस्तगत एलसीबीची धडाकेबाज कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपा...
शिर्डी दर्शनासाठी आलेल्या भाविकाची बॅग चोरणारे आरोपी पकडले..आयफोनसह परकीय चलन हस्तगत एलसीबीची धडाकेबाज कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बॅग लिफ्टिंग करून मोबाईल व परकीय चलनासह रोख रक्कम चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी श्रीरामपुर येथे अटक करून त्यांच्याकडून सुमारे 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या कारवाईमुळे शिर्डी परिसरात वारंवार होणाऱ्या बॅग चोरीच्या घटनांचा एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी पुजीता गोविंद रेड्डी (वय 25,रा.रायचूर,कर्नाटक) हे आपल्या कुटुंबासह दि.24 डिसेंबर 2025 रोजी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते.दर्शनानंतर शिर्डी साईबाबा संस्थानच्या भक्तीनिवास (500 रूम) येथे गेटजवळ त्यांनी आपली बॅग ठेवली असता,अज्ञात चोरट्यांनी सदर बॅग लांबवली.या बॅगेत एक मोबाईल फोन, भारतीय व अमेरिकन चलन, आधार कार्ड,दोन क्रेडिट कार्ड असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल होता.
या घटनेबाबत फिर्यादी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गु.र.नं. 1040/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिर्डी परिसरात अशा प्रकारच्या बॅग चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस विशेष सूचना देत अशा गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे तसेच पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से,राहुल डोके,सतीश भवर व चालक भगवान धुळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.दि.07 जानेवारी 2026 रोजी गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर गुन्हा आशिष मंगलम व विठ्ठल शेलार यांनी केल्याची माहिती पथकास मिळाली. आरोपी श्रीरामपुर परिसरात असल्याची खात्री होताच पथकाने तात्काळ अशोकनगर,श्रीरामपुर येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आशिष रविंद्र मंगलम (वय 20,रा. अशोकनगर,श्रीरामपुर),विठ्ठल संजय शेलार (वय 20, रा. अशोकनगर,निपाणी वडगाव,ता. श्रीरामपुर) अशी असून सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तयांच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचा आयफोन व 10,000 रुपये रोख (यामध्ये परकीय चलनाचा समावेश) असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.

No comments