चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा स्वीकारला पदभार चोपडा प्रतिनिधी (संपादक...
चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा स्वीकारला पदभार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
१ जानेवारी २०२६ चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील यांनी आज पहिल्या जानेवारीला नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तालुक्याचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
आयोजित समारंभात सर्व निवडून आलेले नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभावर लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झवर यांनी झालेल्या कामांचे व उर्वरित कामांच्या आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदार यांच्यासमोर मांडला त्यानंतर नम्रता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, मी जनतेच्या विश्वासावर खरे उतरेन आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने चोपड्याचा सर्वांगीण विकास करेन. चोपड्याच्या सर्वांगीण विकास हाच आमच्या देह राहील असे लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी सांगितले

No comments