डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी कन्यांचे बडिंग-ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रात्यक्षिक इदू पिंजारी, फैजपुर (संपादक :- हेमकां...
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी कन्यांचे बडिंग-ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रात्यक्षिक
इदू पिंजारी, फैजपुर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील कृषी कन्या (रावे रब्बी) २०२५-२६ यांच्या वतीने बडिंग व ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोनशेटवाड तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी कृषी कन्या साक्षी काळे, मिनल कार्लेकर, नेत्रा खराटे व विशाखा रायकर यांनी शेतकऱ्यांना बडिंग व ग्राफ्टिंग या आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. बडिंग म्हणजे एका झाडाच्या कोंबातून (बड) दुसऱ्या झाडाच्या तणात बसविणे, तर ग्राफ्टिंग म्हणजे दोन वेगवेगळ्या झाडांच्या तणांना एकत्र जोडून एकसंध रोप तयार करणे, असे प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे फळझाडांची गुणवत्ता सुधारते तसेच उत्पादनात लक्षणीय वाढ होते, असेही कृषी कन्यांनी सांगितले. प्रदर्शनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे समाधान करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कृषी शिक्षण व प्रत्यक्ष शेती यांचा प्रभावी संगम या कार्यक्रमातून दिसून आला.

No comments