फैजपूर साखर कारखान्याजवळ भीषण अपघात; दोन वाहनांची समोरासमोर धडक, चालक जखमी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ०३ जाने...
फैजपूर साखर कारखान्याजवळ भीषण अपघात; दोन वाहनांची समोरासमोर धडक, चालक जखमी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर ०३ जानेवारी २०२६ रोजी येथील साखर कारखान्याजवळील मोर नदीच्या पुलावर दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 3 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते पावणे दहा वाजेच्या दरम्यान घटना घडली दरम्यान रेहान खान व इमरान खान हे दोघं चालक पुलाच्या खाली कोसळले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात एक ॲपे मालवाहतूक रिक्षा थेट पुलाखाली कोसळली, तर दुसरे वाहनही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहे. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकांना पुलाखालून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या पुढील तपास सुरू आहे.

No comments