काँग्रेस पक्षातर्फे ज्योतीताई सूर्यवंशी यांना वाढता पाठिंबा उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली लातूर {जि.प} उत्तम माने (संपादक -:- ह...
काँग्रेस पक्षातर्फे ज्योतीताई सूर्यवंशी यांना वाढता पाठिंबा उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली
लातूर {जि.प} उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावांची चर्चेला वेग आला असून निलंगा तालुका लांबोटा पंचायत समिती मतदार संघात उमेदवाराचे चढावड सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर लांबोटा मतदारसंघातून ज्योतीताई गोविंद सूर्यवंशी यांची दावेदारी असून या मतदारसंघात नागरिकांकडून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी स्वागत सुद्धा केले जात आहे ज्योतीताई सूर्यवंशी यांचे पती गोविंद सूर्यवंशी यांचा जनसंपर्क दांडगा असून निडरपणे गोरगरीब जनतेची ते नेहमी मदत करत असतात त्यांनी आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व महात्मा फुले विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ संजय गांधी योजना व तसेच लाडकी बहीण योजना असे अनेक शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे लातूरचे आमदार अमित देशमुख निलंगा तालुक्याचे काँग्रेसचे पक्षाचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर तसेच जिल्हाअध्यक्ष अभयदादा साळुंखे लालासाहेब पटेल अजित माने, हमीद शेख यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे मानले जातात अतिशय प्रामाणिक अतिशय धाडसी असलेले गोविंद सूर्यवंशी हे सुद्धा त्यांच्या पायावर पाय ठेवून अग्रेसर असतात लांबोटा पंचायत समिती मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटिबंध असून त्यांना त्यांच्या पत्नीला संधी मिळाल्यास लांबोटा मतदारसंघाचा चौफेर विकास करू असे आमचे प्रतिनिधी उत्तम माने यांच्याशी बोलताना व्यक्त केले तरुण वर्गाचा फार मोठा जनसंपर्क असलेला गोविंद सूर्यवंशी नेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत तसेच मातंग समाजासाठी अन्याया विरुद्ध आवाज उठवून उपोषणे आंदोलने आधीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असतो त्यांना या मतदारसंघात फार मोठा पाठिंबा मिळत असून त्यांची पत्नी ज्योतीताई सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे नागरिकांचा फार मोठा पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय पक्का मानला जात आहे

No comments